ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?

इमेज
          रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय. साधारणत ०३:४० ते ०५:३० दरम्यानचा कालावधी यावेळी ज्याप्रकारे पृथ्वी फिरते. आणि त्यामुळे जे काही मूलभूत बदल घडतात. तेव्हा तुमची शरीर प्रणाली एक विशिष्ट पद्धतीने काम करते. आणि नैसर्गिकरित्या शरीरातील पीनियल ग्रंथि मधून स्त्रावणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते. आणि ब्रह्मामुहूर्ताच्या काळात पीनियल ग्रंथि मधून हा स्त्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो. ज्यामुळे आपले शरीर यंत्रणेला सहज स्थैर्य प्राप्त होऊन शरीर आणि विचार यांचा सुंदर मेळ घालता येतो. आणि विचारांवर नियंत्रण मिळवता येते. आणि मन स्थिर करता येते. ही अशी वेळ आहे, की ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने घडवू शकतात.            लोकांना सतत होणार्‍या अनेक समस्यांचे कारण आपण ती जाणीव गमावली आहे. की सृष्टीच्या कसे तालात रहावं. आपण निसर्गाशी असलेला तारतम्य गमावलं आणि आपल्याला असं वाटतंय की हेच आपलं मूळ स्वरूप आहे. जर तुम्ही सृष्टीच्या तारतम्यात राहाल तर तुम्ही पण पहाटे 3:40 च्या सुमारास जागे व्हालं. जर तुम्ही जागृत असाल तर ? जर तुम्ही ब्रह्मम

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात ?


          भौगोलिक दृष्ट्या बघता वडाचे झाड भारतीय उपखंडात सर्वत्र आढळते. या झाडाचा कधीही क्षय होत नाही म्हणून या झाडाला अक्षय असेही म्हणतात त्याच्या  पारंब्या जमिनीतून पुन्हा-पुन्हा उगवतात. आणि पुन्हा एक नवीन झाड उभे राहते. या झाडात आपल्याला अनेक प्रकारची जैवविविधता आढळते. उन्हाळ्यात या झाडाच्या पानांचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन, पाणी बाष्प स्वरूपात पाणी वातावरणात सोडले जाते. व त्यातून ढगांची निर्मिती होऊन हवेत आद्रता व गारवा निर्माण होऊन, तेथील परिसरातील वातावरणात थंडावा जाणवतो. तसेच ह्या झाडाचे पाने मोठी व संख्येने भरपूर असल्याने अनेक विषारी वायू शोषून तेथील हवा शुद्ध ठेवतात. 
          आयुर्वेदात देखील या झाडाला महत्त्वाचे स्थान आहे. या ह्या झाडाचा चीक दातदुखी, संधिवात यांसाठी उपयोगी ठरतो. तसेच पारंब्यांच्या रस केसांसाठी चांगला असतो. आणि मधुमेहासाठी वडाच्या सालीचा काढा गुणकारी ठरतो. आणि पारंब्यांचा रस आपल्याशरीरातील ताप कमी होण्यासाठी वापरतात, यामुळे घाम येऊन शरीरातील ताप निघून जातो.

          हिंदू परंपरेनुसार ज्येष्ठ महिन्यात पोर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे व दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. या सणाच्या माध्यमातून हिंदू धर्मात या वृक्षाला पवित्र मानले जाते. व त्याची तोड करणे अशुभ मानले जाते. निसर्गतः दीर्घ आयुष्य आणि जैवविविधतेने संपन्न असणाऱ्या या  वृक्षाचे जतन व संवर्धन व्हावे हा त्यामागील मूळ उद्देश होता.
          

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वधू-वर गुण जुळवणी नेमकं काय असतं ?

ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?