ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?



          रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय. साधारणत ०३:४० ते ०५:३० दरम्यानचा कालावधी यावेळी ज्याप्रकारे पृथ्वी फिरते. आणि त्यामुळे जे काही मूलभूत बदल घडतात. तेव्हा तुमची शरीर प्रणाली एक विशिष्ट पद्धतीने काम करते. आणि नैसर्गिकरित्या शरीरातील पीनियल ग्रंथि मधून स्त्रावणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते. आणि ब्रह्मामुहूर्ताच्या काळात पीनियल ग्रंथि मधून हा स्त्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो. ज्यामुळे आपले शरीर यंत्रणेला सहज स्थैर्य प्राप्त होऊन शरीर आणि विचार यांचा सुंदर मेळ घालता येतो. आणि विचारांवर नियंत्रण मिळवता येते. आणि मन स्थिर करता येते. ही अशी वेळ आहे, की ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने घडवू शकतात. 
          लोकांना सतत होणार्‍या अनेक समस्यांचे कारण आपण ती जाणीव गमावली आहे. की सृष्टीच्या कसे तालात रहावं. आपण निसर्गाशी असलेला तारतम्य गमावलं आणि आपल्याला असं वाटतंय की हेच आपलं मूळ स्वरूप आहे. जर तुम्ही सृष्टीच्या तारतम्यात राहाल तर तुम्ही पण पहाटे 3:40 च्या सुमारास जागे व्हालं. जर तुम्ही जागृत असाल तर ? जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तात जागे असाल आणि जी काही साधना करण्यास तुम्ही बसता. त्यावेळी तुमच्यातील बीजाला सहाय्यक ठरेल.त्याला अंकुरित होण्यासाठी किंवा ते वेगाने वाढेल इतर वेळेपेक्षा.
          

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात ?

वधू-वर गुण जुळवणी नेमकं काय असतं ?