पोस्ट्स

ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?

इमेज
          रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय. साधारणत ०३:४० ते ०५:३० दरम्यानचा कालावधी यावेळी ज्याप्रकारे पृथ्वी फिरते. आणि त्यामुळे जे काही मूलभूत बदल घडतात. तेव्हा तुमची शरीर प्रणाली एक विशिष्ट पद्धतीने काम करते. आणि नैसर्गिकरित्या शरीरातील पीनियल ग्रंथि मधून स्त्रावणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते. आणि ब्रह्मामुहूर्ताच्या काळात पीनियल ग्रंथि मधून हा स्त्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो. ज्यामुळे आपले शरीर यंत्रणेला सहज स्थैर्य प्राप्त होऊन शरीर आणि विचार यांचा सुंदर मेळ घालता येतो. आणि विचारांवर नियंत्रण मिळवता येते. आणि मन स्थिर करता येते. ही अशी वेळ आहे, की ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने घडवू शकतात.            लोकांना सतत होणार्‍या अनेक समस्यांचे कारण आपण ती जाणीव गमावली आहे. की सृष्टीच्या कसे तालात रहावं. आपण निसर्गाशी असलेला तारतम्य गमावलं आणि आपल्याला असं वाटतंय की हेच आपलं मूळ स्वरूप आहे. जर तुम्ही सृष्टीच्या तारतम्यात राहाल तर तुम्ही पण पहाटे 3:40 च्या सुमारास जागे व्हालं. जर तुम्ही जागृत असाल तर ? जर तुम्ही ब्रह्मम

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात ?

इमेज
          भौगोलिक दृष्ट्या बघता वडाचे झाड भारतीय उपखंडात सर्वत्र आढळते. या झाडाचा कधीही क्षय होत नाही म्हणून या झाडाला अक्षय असेही म्हणतात त्याच्या  पारंब्या जमिनीतून पुन्हा-पुन्हा उगवतात. आणि पुन्हा एक नवीन झाड उभे राहते. या झाडात आपल्याला अनेक प्रकारची जैवविविधता आढळते. उन्हाळ्यात या झाडाच्या पानांचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन, पाणी बाष्प स्वरूपात पाणी वातावरणात सोडले जाते. व त्यातून ढगांची निर्मिती होऊन हवेत आद्रता व गारवा निर्माण होऊन, तेथील परिसरातील वातावरणात थंडावा जाणवतो. तसेच ह्या झाडाचे पाने मोठी व संख्येने भरपूर असल्याने अनेक विषारी वायू शोषून तेथील हवा शुद्ध ठेवतात.            आयुर्वेदात देखील या झाडाला महत्त्वाचे स्थान आहे. या ह्या झाडाचा चीक दातदुखी, संधिवात यांसाठी उपयोगी ठरतो. तसेच पारंब्यांच्या रस केसांसाठी चांगला असतो. आणि मधुमेहासाठी वडाच्या सालीचा काढा गुणकारी ठरतो. आणि पारंब्यांचा रस आपल्याशरीरातील ताप कमी होण्यासाठी वापरतात, यामुळे घाम येऊन शरीरातील ताप निघून जातो.           हिंदू परंपरेनुसार ज्येष्ठ महिन्यात पोर्णिमेच्या दिवशी वटपौर्णि

गोत्र म्हणजे काय ?

इमेज
          भारतीय संस्कृती एक संपन्नशाली संस्कृती होती. परंतु परकीय आक्रमणामुळे त्यात, बरेच काही बदल झाले. पूर्वी अशाप्रकारचे काही मंदिर होते. जेथे सर्व समुदायांच्या लोकांचं जाणं-येणं असत परंतु असे काही मंदिर पण असत. जेथे फक्त काही विशिष्ट समुदायाचे लोक जात असत. ती मंदिरे कुलदैवत या नावाने ओळखले जात. परंतु आज अशी मंदिरे फारच कमी पाहायला मिळतात. या मंदिरांचा संबंध थेट आपल्या गोत्राशी होता. गोत्राचे महत्त्व सांगायचे झाले तर आजच्या आधुनिक जगात DNA टेस्टनुसार काही विशिष्ट समुदायाचा हजारो वर्षाचा इतिहास बघता येतो. कारण DNA मध्ये त्या समुदायाची विशिष्ट माहिती साठवलेली असते. प्राचीन काळी अशी माहिती साठवण्याचे काम कुळ, गोत्र किंवा वंश करत असे. आजही असा काही समुदाय आहे. कि जे त्यांच्याच जमातीतील पुरुष किंवा स्त्री यांच्याशी विवाह करणे पसंत करतात. कारण त्यांनी आजही आपली हजारो वर्षांची संस्कृती जपली आहे.            हिंदू धर्मानुसार गोत्र हे एका पुरुष पूर्वजांपासून अखंडपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. गोत्रे ऋषीच्या नावा वरून ओळखली जातात. हि गोत्रे आज आपल्याला जातीनुसार आणि प्

वधू-वर गुण जुळवणी नेमकं काय असतं ?

इमेज
           प्राचीन भारतीय संस्कृतीत ऋषिमुनींनी मानवी जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी समाजात काही नियम बनवले होते. त्यातील एक नियम कुंडली जुळवणे किंवा गुण जुळवणे होय. हिंदू धर्मात पत्रिका जुळवणे विवाहबंधनाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गुण जुळवणे हे भावी वधू-वरांच्या भविष्यातील सुखसमृद्धीचा वेध घेण्याचा एक मार्ग आहे.  हे फक्त जोडी किंवा अनुकूलतेच्या बाबतीत सांगत नाही. तर विवाह बंधनात बांधल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या आत्म्याची अध्यात्मिक, शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक अनुकूलतेच्या बाबतीत देखील माहिती देते. पत्रिका जुळवणीने आपण नात्यांची स्थिर-अस्थिरता तसेच दिर्घ आयुष्याची वाटचाल कशाप्रकारे असेल याची माहिती प्राप्त करू शकतो.            वैदिक ज्योतिषाच्या आधारे बघितले तर कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आठ प्रकारचे गुण आणि अष्टकुटांची मिलन असते. हे गुण: वर्ण, वश्य, तारा, योनी, गृह मैत्री, गण,  भकूट, आणि नाडी या सर्व जुळवणी नंतर ३६ अंक असतात. विवाहाच्या वेळी कुंडली जुळताना ३६ पैकी १८ गुण जुळले तर विवाह यशस्वी राहील असे मानले जाते. हे १८ गुण स्थिती, स्वास्थ, दोष, प्रवृत्ती, संतान इत्य

मंदिरात नारळ का फोडतात?

इमेज
         भारतीय संस्कृती मंदिरात नारळ फोडून देवाला वंदन केले जाते. पण आपल्यापैकी बहुतेक जणांना हे माहिती नाही, कि मंदिरात नारळ का फोडतात. त्यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण आहेत.           धार्मिक कारण बघितले तर प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत देव-देवतेच्या प्रसन्न करण्यासाठी पशुंची बळी देण्याची प्रथा होती. अश्या प्रकारच्या अमानुष पद्धतीला पर्याय म्हणून , ऋषी मुनींनी नारळ फोडण्याची पध्दत आणली. त्यामागे त्यांचा उद्देश असा होता. कि मानवाने आपल्या आयुष्यातील अहंकार , मत्सर, द्वेष यांचा त्याग करुन एक चांगला मार्ग निवडावा.           वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर असे समजते कि नारळातील प्रसादरुपी खोबरे आपल्या शरीरासाठी उत्कुष्ट दर्जाचे इंधन म्हणून काम करते. त्यात मेद, प्रथिने, पोट्याशियम, क्लोरिन आणि  जीवनसत्त्व हे भरपूर प्रमाणात मिळते.हे प्रमाण इतर फळांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे, आपल्या शरीराला वात, पित्त, मधुमेह, यांसारख्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या संस्कृतीत नारळाला, आपल्या दैनंदीन जीवनाचा एक भाग म्हणून समावेश केला गेला आह

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात ?

वधू-वर गुण जुळवणी नेमकं काय असतं ?

ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?